गोवा खबर

करमळी मेगा प्रकल्पाला ‘ब्रेक’; मुख्यमंत्र्यांचे काम बंद करण्याचे आदेश

Published

on

Spread the love

गोवा खबर : करमळी येथील वादग्रस्त मेगा प्रकल्पाविरोधात स्थानिकांनी आणि सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी पुकारलेल्या आंदोलनाला यश आले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप करत या प्रकल्पाला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचे आणि तीन दिवसांत बांधकाम बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

प्रकल्पाच्या विरोधात आंदोलकांनी नगर नियोजन (TCP) खात्याच्या कार्यालयावर धडक दिली होती. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या ठिय्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी बोरकर यांना फोनवरून आश्वासित केले की, या प्रकल्पाच्या प्रवर्तकांवर कारवाई केली जाईल. या आंदोलनात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि ‘आरजी’चे नेते मनोज परब यांनीही सहभाग नोंदवला होता.

Trending

Exit mobile version