गोवा खबर

चिंबल येथील ‘युनिटी मॉल’वरून मुख्यमंत्री आणि विरोधक आमनेसामने

Published

on

Spread the love

गोवा खबर : चिंबल येथे प्रस्तावित असलेल्या ‘युनिटी मॉल’ला स्थानिक स्तरावर होत असलेल्या विरोधानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी चर्चेची तयारी दर्शवली आहे. हा मॉल गोमंतकीयांच्या, विशेषतः महिला बचत गट आणि स्थानिक उद्योजकांच्या हिताचाच असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या मते, या मॉलचा एक संपूर्ण मजला ‘स्वयंसाहाय्यता गटां’साठी राखीव असेल, ज्यामुळे त्यांना आपली उत्पादने विकण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळेल. हा प्रकल्प सरकारी जमिनीत असून सर्व कायदेशीर परवानग्या घेतल्या आहेत. पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही आणि शेजारील तलावाचेही रक्षण केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान, पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनीही या प्रकल्पाचे समर्थन केले आहे. मात्र, हा विषय सध्या न्यायप्रविष्ट असल्याने त्यांनी अधिक भाष्य करणे टाळले. त्यांनी असेही नमूद केले की, चिंबल परिसरात अनेक खाजगी इमारतींना विरोध होत नाही, मग सरकारी प्रकल्पालाच का?

Trending

Exit mobile version