गोवा खबर

 पणजी मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले; सर्व ३० जागा जिंकण्याचा बाबूश मोन्सेरात यांचा दावा

Published

on

Spread the love

गोवा खबर : पणजी महानगरपालिकेच्या (CCP) निवडणुकीला अद्याप दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी शिल्लक असतानाच, पणजीचे आमदार तथा महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. “आम्ही कोणत्याही क्षणी निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार आहोत,” असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले.

गेल्या निवडणुकीत मोन्सेरात यांच्या गटाने २५ जागांवर विजय मिळवला होता. मात्र, यंदा त्यांनी सर्वच्या सर्व ३० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मोन्सेरात म्हणाले की, पणजीतील जनतेचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्याच पाठिंब्यामुळे आम्ही हे यश मिळवू. यंदा उमेदवारांची निवड करताना ‘नवीन चेहऱ्यांना’ संधी देण्याचे धोरण त्यांनी आखले आहे. यासाठी ते भाजप पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार आहेत.

“माझे वैयक्तिक काही उमेदवार असतीलच, पण पक्षाने सुचवलेल्या नावांचाही विचार करून अंतिम निर्णय घेतला जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

Trending

Exit mobile version