गोवा खबर

गोव्याची अस्मिता धोक्यात; विशेष दर्जासाठी जनआंदोलनाची गरज : फर्दिन रिबेलो

Published

on

Spread the love

गोवा खबर : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती फर्दिन रिबेलो यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे गोमंतकीयांना सावध केले आहे. गोव्याची जमीन, संस्कृती आणि लोकसंख्याशास्त्रीय रचना वेगाने बदलत असून ‘झोन चेंजिंग’मुळे भातशेतीचे रूपांतर सिमेंटच्या जंगलात होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

रिबेलो यांनी गोव्याला नागालँडसारखा विशेष दर्जा मिळण्याची मागणी केली आहे, जेणेकरून बाहेरील व्यक्तींना जमिनी खरेदी करण्यापासून रोखता येईल. त्यांनी तरुणांना ‘सेव्ह गोवा’ मोहिमेत सक्रिय होण्याचे आवाहन करत राजकीय लाभासाठी अस्मितेचा बळी देऊ नका, असा सल्लाही मतदारांना दिला आहे.

Trending

Exit mobile version