गोवा खबर : एअर मार्शल तेजिंदर सिंग यांनी आज 1 जानेवारी 2026 रोजी भारतीय हवाईदलाच्या दक्षिण-पश्चिम हवाई कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर सिंग यांनी युद्ध स्मारकावर हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असलेल्या एअर मार्शल तेजिंदर सिंग यांची 13 जून 1987 रोजी भारतीय हवाईदलाच्या लढाऊ शाखेत नियुक्ती झाली. ‘श्रेणी ए’ पात्र फ्लाइंग इन्स्ट्रक्टर म्हणून त्यांना 4500 हून अधिक तासांचा व्यापक उड्डाण अनुभव आहे. एअर मार्शल तेजिंदर सिंग यांनी लढाऊ स्क्वॉड्रन, रडार स्टेशन, हवाई तळ प्रमुख तसेच जम्मू-काश्मीरचे एअर ऑफिसर कमांडिंग म्हणून जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. सध्याच्या नियुक्तीपूर्वी ते हवाईदलाच्या प्रशिक्षण कमांडचे ते एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ होते.
अतुलनीय सेवेबद्दल त्यांना 2007 मध्ये वायू सेना पदकाने तर 2022 मध्ये अति विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले.