गोवा खबर

मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नववर्षाच्या निमित्ताने अधिकाऱ्यांना दिला लक्ष्यपूर्ण सेवेचा संकल्प

Published

on

Spread the love

गोवा खबर : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या दोन्ही मंत्रालयांतील अधिकाऱ्यांना संकल्प दिला. यासोबतच, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्रालयांचे 2026 हे वर्ष नव्या ऊर्जेने आणि दृढ संकल्पासह सुरू झाले.

आज केंद्रीय मंत्री चौहान यांनी मंत्रालयांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार “सरकार फाइल्स मध्ये नव्हे, तर जनतेच्या जीवनात दिसले पाहिजे” हा संकल्प पुन्हा अधोरेखित केला. देशातील 70 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालयांशी थेट किंवा अप्रत्यक्षपणे जोडलेली आहे. त्यामुळे मंत्रालयाचा प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक पाऊल शेतकरी तसेच ग्रामीण जनतेच्या कल्याणासाठीच असले पाहिजे, असे शिवराज सिंह चौहान म्हणाले. अधिकाऱ्यांनी संघभावनेतून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. अधिकाऱ्यांनी साप्ताहिक उद्दिष्टे निश्चित करावित तसेच संपूर्ण वर्षाची कृती योजना तयार करावी असे निर्देश त्यांनी दिले. जेणेकरून कामाची गती वाढेल आणि परिणामांमध्ये स्पष्टता येईल, हे त्यांनी अधोरेखित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सुधारणांची जी दिशा दाखवली आहे त्यानुसार प्रक्रिया सुलभ करणे आणि जनतेला दिलासा देणे ही मंत्रालयाची सर्वोच्च प्राथमिकता असली पाहिजे, हे केंद्रीय मंत्र्यांनी अधोरेखित केले. त्यांनी अधिकाऱ्यांना अशी कार्यपद्धती विकसित करण्याचे आवाहन केले की, कोणत्याही व्यक्तीला आपल्या कामासाठी वारंवार कार्यालयात फेऱ्या माराव्या लागू नयेत.

शिवराज सिंह यांनी निर्देश दिले की, योजनेचा निधी वितरित करण्यापूर्वी राज्यांशी चर्चा व्हावी, ज्यामुळे निधीचा पारदर्शक आणि योग्य वापर सुनिश्चित करता येईल. यासोबतच, राज्यांनी कृषी विकासासाठी कालबद्ध आराखडा तयार करण्याचे निर्देश  देखील दिले आहेत.

‘विकसित भारत – जी राम जी’ योजनेअंतर्गत आदर्श गावांच्या विकासावर भर देत चौहान यांनी स्पष्ट केले की, ग्रामीण भारतातील सर्वोत्तम विकासकामे आता संपूर्ण देशासाठी प्रेरणादायक उदाहरण ठरतील.

अधिकाऱ्यांनी नवीन वर्षात दृढ निर्धार आणि लक्ष्य समोर ठेऊन काम करावे, असे चौहान यांनी अधिकाऱ्यांना आवाहन केले. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या आणि गावकऱ्यांच्या जीवनात वास्तव बदल घडवता येईल.

Trending

Exit mobile version