भारतात शाखा, प्रतिनिधी कार्यालये किंवा उपकंपन्या सुरू करण्यासाठी इच्छुक असलेल्या परदेशी बँकांच्या प्रस्तावांवर विचार
गोवा खबर : वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम. नागराजू यांनी आज आंतर-विभागीय समिती (आयडीसीची) बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले. या बैठकीस गृह मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, वाणिज्य विभाग आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आरबीआयकडून आलेल्या प्रस्तावांवर विचार करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती.
भारतात शाखा, प्रतिनिधी कार्यालये किंवा उपकंपन्या सुरू करण्याची इच्छा असलेल्या परदेशी बँकांचे हे प्रस्ताव होते.
सविस्तर चर्चेनंतर समितीने सादर केलेल्या प्रस्तावांना बैठकीत मान्यता मिळाली. आयडीसी या समितीत वित्तीय सेवा विभाग हा प्रमुख विभाग म्हणून परदेशी व देशांतर्गत बँकांकडून आलेले प्रस्ताव तपासतो. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी ही समिती गृह मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि वाणिज्य विभाग यांच्याशी सल्लामसलत करते. त्यामुळे सुरक्षा, राजकीय आणि आर्थिक दृष्टिकोनातून आवश्यक सूचना मिळू शकतात.