गोवा खबर : टपाल विभागातून निवृत्त झालेल्या पेन्शनधारकांच्या तक्रारींचे प्रभावीपणे निवारण करण्यासाठी दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजता पणजी येथे पेन्शन अदालतचे आयोजन करण्यात आले आहे.
टपाल विभागातून निवृत्त झालेल्या/सेवेत असताना मयत झालेल्या आणि निवृत्तीवेतनाचे 3 महिन्यांच्या आत निवारण न झालेल्या पेन्शनधारकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पणजी येथील पोस्ट मास्तर जनरल, प्रादेशिक टपाल कार्यालयात पेन्शन अदालत होणार आहे.
संबधित पेन्शनधारकानी विहित नमुन्यातील अर्ज दिनांक 15 जानेवारी 2026 पर्यंत महेश एन., वरिष्ठ लेखा अधिकारी/सचिव, पेन्शन अदालत, कार्यालय पोस्टमास्टर जनरल, पणजी-403001 अथवा ईमेल आयडी accts.goa@indiapost.gov.in वर पाठवावे.
पूर्णपणे उत्तराधिकार वाद आणि धोरणात्मक बाबींशी संबंधित असलेल्या तक्रारी या पेन्शन अदालतमध्ये विचारात घेतल्या जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.