गोवा खबर

हडफडे येथील नाईट क्लब दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘सुराज्य अभियान’च्या वतीने उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सूपुर्द

Published

on

Spread the love
  • राज्यातील अनधिकृत नाईट क्लबांववर कारवाई करण्याची मागणी!

गोवा खबर : हडफडे येथील नाईट क्लब दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘सुराज्य अभियान’ने उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकार्‍यांना तक्रार वजा निवेदन सूपुर्द केले आहे. यामध्ये सार्वजनिक सुरक्षेला धोका पोहोचवणार्‍या राज्यातील अनधिकृत नाईट क्लबांववर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन देतांना ‘सुराज्य अभियान’चे सर्वश्री प्रमोद नाणोस्कर, अधिवक्ता रुपेश गावस आणि राज बोरकर यांची उपस्थिती होती.

निवेदनात म्हटले आहे की, हडफडे येथील ‘बिर्च बाय रोमियो लेन’ या नाईट क्लबमध्ये झालेल्या भीषण दुर्घटनेमुळे गोव्यातील सार्वजनिक सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी स्पष्ट झाल्या आहेत. या दुर्घटनेमुळे गोव्यातील अनेक नाईट क्लब्स, पार्ट्या किंवा मोठे कार्यक्रम करण्याची ठिकाणे यांच्याकडे अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना नसणे, आवश्यक सुरक्षा उपाययोजना न करणे आदी अनेक त्रुटी असल्याचे उघड झाले आहे; मात्र या दुर्घटनेनंतर प्रशासन सक्रिय झाले असून सुरक्षेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत.

घटनेनंतरची कारवाई पुरेशी नसून, राज्यभर कडक, पारदर्शक व कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक व्यवस्था उभारणे अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर ‘सुराज्य अभियान’ने पुढील मागण्या केल्या आहेत. हडफडे दुर्घटनेच्या प्रकरणी नाईट क्लबचे व्यवस्थापनासह संबंधित दायित्व निश्चित करून दोषी सरकारी अधिकार्‍यांवर कारवाई करावी. तसेच राज्यातील सर्व नाईट क्लबस् आणि पार्ट्यांची ठिकाणे यांचे तत्काळ पुन: ऑडिट करून परवाने, अग्निसुरक्षा, क्षमतेची मर्यादा आणि सुरक्षा व्यवस्था यांची तपासणी करावी. सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर फौदजारी स्वरूपाची कारवाई करावी. तसेच नाईट क्लब आदी ठिकाणांसाठी मार्गदर्शक तत्त्वे लागू करून त्याची कठोर कार्यवाही करावी.

Trending

Exit mobile version