गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस्थळ ‘सदैव अटल’ येथे श्रद्धांजली वाहिली. अटलजींचे जीवन जनसेवा व राष्ट्रसेवेसाठी समर्पित होते; त्यांचे विचार नेहमीच देशातील जनतेला प्रेरणा देत राहतील, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
“माजी पंतप्रधान, आदरणीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त, आज दिल्लीतील त्यांच्या ‘सदैव अटल’ स्मारकाला आदरांजली वाहण्याचे सौभाग्य मला मिळाले. सार्वजनिक सेवा आणि राष्ट्रसेवेसाठी समर्पित त्यांचे जीवन देशवासीयांना नेहमीच प्रेरणा देईल.”