गोवा खबर

विश्वजीत व दिव्या राणे यांचा प्रभाव अधिक दृढ

Published

on

Spread the love
  • झेडपी निकालातून स्पष्ट संकेत

गोवा खबर : सत्तरी तालुक्यातील तिन्ही झेडपी मतदारसंघांत भाजप उमेदवारांना दहा हजारांहून अधिक मतांची आघाडी मिळाल्याने मंत्री विश्वजीत राणे व आमदार दिव्या राणे यांचा प्रभाव वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. उसगावमध्येही भाजपने मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.

चारही मतदारसंघांत भाजपने नवे, तुलनेने कमी परिचित चेहरे दिले होते. मात्र, राणे दांपत्याच्या सातत्यपूर्ण प्रचारामुळे जनतेने त्यांना भरभरून पाठिंबा दिला. सत्तरीत काँग्रेस, आरजीपी आणि ‘आप’चा जवळपास सफाया झाल्याचे निकालातून दिसून आले.

Trending

Exit mobile version