गोवा खबर

गोवा विद्यापीठ निवडणुकांत विद्यार्थी ऐक्याचा ऐतिहासिक विजय : अमरनाथ पणजीकर 

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा विद्यापीठ विद्यार्थी परिषद निवडणुकांत एनएसयूआय (काँग्रेसची विद्यार्थी संघटना) आणि गोवा फॉरवर्ड विद्यार्थी विभाग यांच्या संयुक्त आघाडीने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्चा निर्णायक पराभव केल्याबद्दल गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे मीडिया विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी या विजयाचे स्वागत केले आहे.

लोकशाहीवादी शक्ती एकत्र आल्या तर काहीही अशक्य नाही, हे या विजयाने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. गोवा विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी फूट पाडणाऱ्या राजकारणाला नाकारून ऐक्य, लोकशाही आणि प्रगत विचारांना पसंती दिली आहे, असे पणजीकर यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, हा कौल शैक्षणिक संस्थांतील हुकूमशाही कार्यपद्धती व राजकीय हस्तक्षेपाविरोधातील वाढता असंतोष दर्शवतो. आज विद्यार्थ्यांनी दाखवलेले ऐक्य म्हणजेच २०२७ मध्ये गोव्यातील भाजप सरकारच्या अंताची सुरुवात आहे, असेही त्यांनी नमूद केले.

पणजीकर यांनी गोवा विद्यापीठाच्या नव्याने निवडून आलेल्या विद्यार्थी परिषदेच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. नवीन परिषद विद्यार्थ्यांच्या कल्याण व उन्नतीसाठी प्रामाणिकपणे काम करेल, उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहील आणि कॅम्पसमध्ये लोकशाही मूल्ये, हक्क व स्वातंत्र्य यांचे ठामपणे संरक्षण करेल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे, असे ते म्हणाले.

विद्यापीठ पातळीवरील लोकशाही अधिक मजबूत करणाऱ्या सर्व विद्यार्थी संघटना व मतदार विद्यार्थ्यांचेही त्यांनी अभिनंदन केले.

Trending

Exit mobile version