गोवा खबर

भाजपाच्या जि.पं. उमेदवारांना प्रतिसाद ही डबल इंजिन सरकारच्या कामाची पोचपावती:र्यटनमंत्री रोहन खंवटे

Published

on

Spread the love
सुकूरमध्ये अस्नोडकरांच्या विजयाची दिली खात्री
गोवा खबर: मागील पाच सहा दिवसांत भाजपाचे सुकूर जिल्हा पंचायत मतदारसंघ उमेदवार अमित अस्नोडकर यांना मतदारांचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहाता, त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास पर्वरीचे आमदार तथा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी व्यक्त केला आहे.
ते म्हणाले की, आराडी, सुकूर, कदंबा रोड, वर्षा कॉलनी, सॉल्सन कॉलनी आदी वेगवेगळ्या ठिकाणी घेतलेल्या कोपरा सभांना मतदारांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. केंद्रात माननीय प्रधानमंत्री मोदी जी व राज्यात मुख्यमंत्री डॉ प्रमोद सांवत यांच्या सरकारने केलेल्या कार्याची ही पावती असल्याचे खंवटे म्हणाले.
२०१२, २०१७ व २०२२ च्या विधानसभा तसेच विविध लोकसभा निवडणुकीत मतदारांनी जी साथ आणि मतरूपी आशीर्वाद दिले आहेत, ते केवळ प्रगतीसाठी असल्याचे खंवटे म्हणाले. लोक प्रत्यक्ष काम पाहातात आणि त्यानुसार कामाचे मूल्यांकन करून मतांचे आशीर्वाद देतात असे ते पुढे म्हणाले.
आराडी येथील एका कोपरा सभेत मार्गदर्शन करताना त्यांच्यासोबत उमेदवार अस्नोडकर तसेच सुकूर सरपंचा सोनिया पेडणेकर उपस्थित होत्या. अस्नोडकर यांनी यावेळी बोलताना सर्वांसोबत राहून त्यांच्या बरोबरीने पुढे जाण्याचा मानस व्यक्त केला. ते म्हणाले की, आम्ही सारे संघटीतपणे पुढे जाऊया, जनतेचा व गांवच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करू असे आश्वासनही त्यांनी दिले.

Trending

Exit mobile version