गोवा खबर

१९ डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दिन समारंभ

Published

on

Spread the love

गोवा खबर : राज्य सरकार गोवा मुक्तीचा ६४ वा वर्धापन दिन १९ डिसेंबर २०२५ रोजी साजरा करणार आहे. ध्वजारोहण समारंभ गोवा विद्यापीठ मैदान, ताळगाव, गोवा येथे सकाळी ९.१५ वाजता होणार आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत राष्ट्रध्वज फडकवतील आणि संचलनाची व मार्च पास्टची पाहणी करतील आणि मानवंदना देतील.

मडगाव येथे सार्वजनिक बांधकाममंत्री मंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते हा समारंभ होणार आहे, फोंडा येथे वीजमंत्री सुदीन ढवळीकर ध्वजारोहण करतील, पर्यटन मंत्री रोहन खवंटे म्हापसा येथे ध्वजारोहण करणार, वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो चिखली वास्को येथे ध्वजारोहण करतील, कला व संस्कृतीमंत्री रमेश तवडकर काणकोण येथे ध्वजारोहण करतील, मत्स्योध्योग मंत्री निळकंठ हळर्णकर पेडणे येथे ध्वजारोहण करतील,  समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते सांगे येथे ध्वजारोहण होईल, जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते केपे येथे ध्वजारोहण होणार आहे. मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट डिचोली येथे ध्वजारोहण करतील आणि धारबांदोडा व वाळपई येथे उपजिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील.

Trending

Exit mobile version