गोवा खबर

सुकूर जि. पं. मतदारसंघात अस्नोडकरांना विजयाची खात्री

Published

on

Spread the love
गोवा खबर: सुकूरच्या विविध भागांचा प्रत्यक्ष दौरा आणि कोपरां सभांमधून मतदारांशी संपर्क केल्यानंतर आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीत मला विजयाची खात्री वाटत असल्याचे भाजपाचे जि.पं. उमेदवार अमित अस्नोडकर यांनी सांगितले.
आराडी, खर्रे, 20 कलमी वसाहत तसेच साळगांव व कळंगुट मतदारसंघाचा जो भाग सुकूर जि. पं मतदारसंघात समाविष्ट आहे, तेथील मतदारांशी मी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी वार्तालाप केल्याचे ते म्हणाले. या निवडणुकीत सुकूरच्या सर्वांगीण विकासासाठी आपले प्रयत्न राहाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, अस्नोडकर यांच्या प्रचारासाठी झालेल्या वेगवेगळ्या कोपरा बैठकांमधून स्थानिक आमदार तथा पर्यटनमंत्री रोहन खंवटे हे देखील मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन अस्नोडकर यांच्या प्रचार कार्यात सहभागी झाले आहेत. मायणा कपेल, कदंबा मार्ग, जोशवाडो गणेश मंदिर, वाडे, वर्षा क़ॉलनी, प्रभू रेसिडेन्सी आदी भागातील कोपरा सभांना खंवटे यांच्यासह सरपंच सोनिया पेडणेकर व सत्ताधारी पंचसदस्यांनी मार्गदर्शन केले आहे.
मतदारांचा मिळणारा उदंड प्रतिसाद पाहाता मला विजयाची पूर्ण खात्री असून मतदार विकासाच्या बाजूने मतदान करतील असा ठाम विश्वास अस्नोडकर यांनी व्यक्त केला आहे. दिवसभरात मी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेत, संध्याकाळी कोपरा सभांमधून मतदारांपर्यंत पोचण्याचा माझा प्रयत्न असतो, असे अस्नोडकर यांनी सांगितले.

Trending

Exit mobile version