गोवा खबर: जिल्हा पंचायत निवडणूकीस अवघे ८ दिवस बाकी राहीले असताना पर्वरीतील पेन्ह द फ्रान्स जिल्हा पंचायत मतदारसंघात भाजपाच्या संदिप साळगांवकर यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
आल्त तोर्डा, गृहनिर्माण वसाहत, कवळेकर सुपर मार्केट, पत्रकार वसाहत, विजयनगर आदी भागात घरोघर मतदारांच्या गाठीभेटी घेतलेल्या भाजपाच्या साळगांवकर यांच्या जवळजवळ २० कोपरा बैठकाही झाल्या आहेत.
कोपरा सभांमध्ये साळगांवकर यांना मतदारांचा जोरदाक प्रतिसाद लाभल्याचे चित्र मतदारांची लाभणारी उपस्थिती दर्शवत आहे. साळगांवकर म्हणाले की, प्रचाराची पहिली फेरी मी पूर्ण केली असून माझे असंख्य पाठीराखे सोबत प्रचार कार्यात सहभागी आहेत. त्यामुळे नवी हुरूप व प्रेरणा मिळत असल्याचे ते म्हणाले.
पर्वरीचे आमदार तथा पर्यटनमंत्री रोहन खंवटे, सरपंच सपनील चोडणकर, सत्ताधारी पंचसदस्यांच्या पाठिंब्यामुळे साळगांवकर यांचे पारडे सध्यातरी जड दिसत आहे. केंद्र व राज्यात भाजपाच्या डबल इंजिन सरकारने केलेल्या विकास कामांवर प्रचार कार्यात भर देण्यात आला आहे.
सरकारच्या विविध लोकोपयोगी योजना सामान्य जनतेपर्यंत नेण्याचे आश्वासन देतानातच, साळगांवकर यांनी आजवरच्या भाजपा सरकारच्या कार्यकाळातील विकासाची माहिती आपल्या मतदारांपर्यंत पोचविली आहे.
२० रोजीच्या निवडणुकीत मतदार मलाच कौल देतील असा विश्वास व्यक्त करताना साळगांवकर म्हणाले की, पंचायत पातळीवरील राजकारणात माझे प्रभाग व पंचायत स्तरावरील विकास प्रक्रियेतील योगदान मतदारांना माहित असल्यामुळे मी निश्चिंत आहे.