गोवा खबर

येत्या 5 व 9 डिसेंबर रोजी पणजीत टपाल विभागाची डाक आणि पेन्शन अदालत

Published

on

Spread the love

गोवा खबर : टपाल विभागाच्या वतीने डाक आणि  पेन्शन अदालत येत्या 5 डिसेंबर रोजी तर 64 वी प्रादेशिक स्तरीय डाक अदालत सकाळी 11 वाजता पणजी येथील पोस्टमास्टर जनरल यांच्या कार्यालयात होणार आहे.

गोवा विभागातील ग्राहकांच्या डाक सेवेशी संबंधित ज्या तक्रारी 6 आठवड्यांत निकाली काढल्या गेल्या नाहीत, त्या तक्रारी या डाक अदालतीत स्वीकारल्या जातील. यामध्ये टपाल सेवा , स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, बचत खाते आणि मनी ऑर्डरच्या पेमेंटसंबंधी तक्रारींचा समावेश असेल. तक्रार करताना, मूळ तक्रार कोणत्या अधिकाऱ्यांकडे पाठवली होती, त्यांचे  नावे, पद आणि तारीख यांसारखी माहिती नमूद करणे आवश्यक आहे. इच्छुक ग्राहक त्यांच्या तक्रारी दोन प्रतींमध्ये सहाय्यक संचालक, डाक सेवा-1, पोस्टमास्टर जनरल कार्यालय, गोवा विभाग, पणजी – 403 001 या पत्त्यावर पाठवू शकतात. तक्रार प्राप्त करण्याची अंतिम तारीख 1 डिसेंबर 2025 आहे.

डाक  सेवा देशाच्या सामाजिक-आर्थिक जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे आणि ती प्रत्येक नागरिकाच्या जीवनावर परिणाम करते. पोस्ट विभाग आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतो, परंतु काहीवेळा संवाद आणि सेवेत त्रुटी राहू शकतात, ज्यामुळे तक्रारी उद्भवतात. अशा तक्रारींचे निवारण करण्यासाठी, विभाग वेळोवेळी ‘डाक अदालत’ आयोजित करतो, ज्यात विभागाचे अधिकारी ग्राहकांच्या तक्रारी ऐकून घेतात आणि त्या त्वरित सोडवण्याचा प्रयत्न करतात.

Trending

Exit mobile version