गोवा खबर

९ ते ११ जानेवारीपर्यंत अ‍ॅक्वा मेगा फिश फेस्टिव्हलचे आयोजन

Published

on

Spread the love

गोवा खबर : ९ ते ११ जानेवारी २०२६ पर्यंत कांपाल पणजीतील मैदानावर अ‍ॅक्वा गोवा मेगा फिश महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा उत्साही महोत्सव गोव्यातील विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्यांना समृद्ध शैक्षणिक अनुभव करून देण्यासाठी हा महोत्सव दरवर्षी विशेष पध्दतीने आयोजित करण्यात येतो. महोत्सवात विविध प्रजातींचे प्रदर्शन करणारे एक्वेरियम फिश गॅलरी, जिवंत फिश पॉन्ड आणि मुले आणि प्रौढांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन खाद्य स्टॉल्स, लोकनृत्य आणि इतर आकर्षक मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल.

मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील व्यावसायिकांना सरकारी योजना आणि मच्छिमारी व्यावसायातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती करून देणे तसेच युवकांना या व्यवसायाकडे आकर्षित करणे हा अक्वा गोवा मेगा फिश महोत्सवाचा उद्देश आहे. गोवा राज्य मच्छिमार संस्कृती आणि व्यवसायासाठी प्रसिध्द असून लोकांनी महोत्सवाला भेट देऊन सदर महोत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे मच्छिमारी संचालनालयाने आवाहन केले आहे.

Trending

Exit mobile version