गोवा खबर

पुजन मालवणकरांची आरोग्य सेवा पोहचली मतदारांच्या घरोघरी

Published

on

Spread the love

गोवा खबर : आपचे जिल्हा पंचायत उमेदवार पुजन मालवणकर यांनी सोनरखेड आणि आसगांव येथे स्थानिक रुग्णांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करुन आधी केले मग मत मागितले अशा स्वरूपाचा संदेश दिला आहे.

आज सकाळी दत्त मंदिर, सोनरखेड– आसगांवचे सचिव विष्णू टळकतकर  यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार मोहिमेचा शुभारंभ  केला. यावेळी स्थानिक गावकऱ्यांनी प्रचारात सहभागी होत आप टीमशी संवाद साधला. त्यावेळी स्थानिकांना गावकऱ्यांसाठी आप मार्फत दत्त मंदिर, सोनरखेड येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले आहे.ही माहिती घरोघरी देण्यात आली. त्यावर नागरिकांनी मंदिरात येऊन आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.

Trending

Exit mobile version