गोवा खबर

‘रणरागिणी’ची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

Published

on

Spread the love

गोवा खबर : १ रुपयात गोव्यातील मुलींशी बोलता येणाऱ्या व गोव्याची प्रतिमा मलीन करणाऱ्या ‘अँप’वर त्वरीत बंदी घालावी, अशी मागणी ‘ रणरागणी’ ने उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक हरीश मडकईकर यांच्याकडे केली आहे. यावेळी रणरागिणीच्या शिष्टमंडळामध्ये राजश्री गडेकर, शुभा सावंत, मोहना नाईक, रसिका दळवी आणि मानसी चोडणकर त्यांच्या समावेश होता.

या’ ॲप’च्या विज्ञापनामध्ये ‘ नवीन ‘ॲप’ डाऊनलोड करा आणि फक्त १ रुपये देऊन ‘हॉट’ आणि ‘तिकट’ मुलींशी चर्चा करा’, असे म्हटले आहे. एका ॲपची सध्या सामाजिक माध्यमातून विज्ञापन चालू आहे. या ॲपमुळे गोव्यातील मुली आणि महिला यांची प्रतिमा बिघडवली जात आहे. अश्लिलतेला सार्वजनिकरित्या प्रोत्साहन दिले जात आहे. युवावर्ग नासवला जात आहे. नैतिकदृषट्या हा प्रकार गंभीर आहे. यामुळे गोव्यातील मुली आणि महिला यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. परशुराम भूमीला भोगभूमी बनवण्याचा हे एक षड्यंत्र आहे. सरकार गोव्याची ‘सन, सी अँड सँड’ (समुद्रकिनारे) ही ओळख पालटून ती आध्यात्मिक पर्यटन केंद्र करण्यासाठी कृतीशील असताना असा ॲपचा प्रसार होणे म्हणजे सरकारच्या प्रयत्नांश खीळ घालण्याचा प्रकार आहे.

Trending

Exit mobile version