गोवा खबर : कतार ट्रॅव्हल मार्ट (क्युटीएम) २०२५ मधील गोवा पर्यटनाच्या पॅव्हेलियनचे आज भारतीय राजदूत विपुल (आयएफएस) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी मान्यवर म्हणून पर्यटन मंत्री रोहन खंवटे, पर्यटन संचालक केदार नाईक, जीटीडीसी चे महाव्यवस्थापक (मार्केटिंग) गेविन डायस, पर्यटन मंत्र्यांचे ओडीसी शॉन मेंडिस आणि इतर अधिकारी उपस्थित होते. या उद्घाटनाने या प्रदेशातील प्रमुख पर्यटन मंचावर गोव्याच्या महत्त्वपूर्ण उपस्थितीची सुरुवात झाली.
उद्घाटनावेळी बोलताना पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणाले, “गोवा आता एका अशा पर्यटन परिवर्तनाच्या टप्प्यात आहे, जिथे टिकाव, स्थानिकांना फायदा आणि अनुभवाधारित पर्यटन ही आमची मुख्य दिशा आहे. क्युटीएम २०२५ मध्ये सहभागी होऊन आम्ही आमच्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय बाजारापेठेशी संबंध अधिक मजबूत करत आहोत. आम्ही येथे विश्रांती पर्यटन, वेलनेस, वेडिंग्स, अॅडवेंचर आणि फिल्म टुरिझममध्ये नव्या भागीदारी निर्माण करण्यासाठी आलो आहोत, आणि गोव्याला एक प्रीमियम जागतिक पर्यटन स्थळ म्हणून अधिक बळकट करण्यासाठी येथे आहोत.”
पहिल्या दिवसाच्या अनुभवाबद्दल सांगताना पर्यटन संचालक केदार नाईक म्हणाले, “क्युटीएम २०२५ हे गोव्याच्या नव्या पर्यटन सेवा, सुधारलेली पायाभूत सुविधा आणि जागतिक पातळीवरील पर्यटकांसाठी आम्ही तयार केलेल्या नव्या अनुभवांची ओळख करून देण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. आम्ही ‘गोवा बियॉण्ड बीचेस’ या संकल्पनेवर भर देत आहोत. रेजनरेटिव्ह टुरिझम, समुदाय-आधारित अनुभव आणि गुणवत्तापूर्ण, सात्यतावादी पर्यटन देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. पहिल्या दिवसापासूनच मिळालेला प्रतिसाद अत्यंत उत्साहवर्धक आहे.”
पॅव्हेलियनमध्ये गोव्याच्या पर्यटनाची नवी दिशा दाखवली असून, राज्याचे बदलते पर्यटन अनुभव आणि नवीन जागतिक ट्रॅव्हल ट्रेंड्स प्रदर्शित करण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी भेट देणाऱ्यांना गोव्याचे रिजनरेटिव्ह टुरिझम, समुदाय-आधारित अनुभव, सुधारलेली पायाभूत सुविधा, तसेच नाईटलाइफवर आधारित नोक्टो ट्युरीझम, फिल्म व स्क्रीन टुरिझमला केंद्रस्थानी ठेवणारे जॅट-सेटींग, आणि वेलनेस व शांत अनुभव देणारे काल्मकेशन यांसारखे नवे ट्रेंड सादर करण्यात आले.
उद्घाटनावेळी पर्यटन मंत्र्यांनी गोव्याची वाढती जागतिक पोहोच आणि उच्च-गुणवत्तेचे, जबाबदार आणि नवोन्मेषी पर्यटन देण्याचा राज्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांनी सांगितले की कतार आणि संपूर्ण जीसीसी प्रदेश हा गोव्याची अत्यंत महत्त्वाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असून, विश्रांती, वेलनेस, अॅडवेंचर, वेडिंग्स आणि फिल्म टुरिझममध्ये मोठ्या भागीदारीची संधी येथे उपलब्ध आहे.
दिवसभर पॅव्हेलियनमध्ये ट्रॅव्हल ट्रेड, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी, मीडिया आणि उद्योग क्षेत्रातील खरेदीदारांनी उत्साहाने सहभाग घेतला. चर्चा गोव्याच्या सुधारलेल्या पायाभूत सुविधा, डिजिटल टुरिझम सेवा, वारसा प्रकल्प आणि समुदायांवर आधारित पर्यटन सर्किट्सवर केंद्रित होती, ज्यातून राज्याचा दीर्घकालीन टिकाऊ विकासाचा संकल्प स्पष्ट होतो.
पहिला दिवस अत्यंत यशस्वी ठरला, ज्यामुळे क्युटीएम २०२५ मध्ये गोवा पर्यटनाची मजबूत आणि भविष्याभिमुख ओळख अधिक अधोरेखित झाली. पुढील दोन दिवसांतही गोवा प्रतिनिधीमंडळ अधिक संवाद, सहकार्य आणि व्यापक आंतरराष्ट्रीय पर्यटन बाजाराशी जोडणी वाढवणार आहे.