गोवा खबर

पर्यटन विभाग मलेशियामध्ये होणाऱ्या गोवा रोडशोमध्ये सादर करणार नव्या युगातील पर्यटन अनुभव

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा पर्यटन विभाग २७ नोव्हेंबर २०२५ रोजी मलेशियामध्ये एक खास गोवा रोडशो आयोजित करणार आहे. या कार्यक्रमाचा उद्देश गोव्याचे नव्याने विकसित पर्यटन दृष्टिकोन, नाविन्यपूर्ण मोहिमा आणि जागतिक पर्यटकांसाठी उपलब्ध विविध अनुभवात्मक पर्यटनाची ओळख मलेशियातील ट्रॅव्हल ट्रेडला करून देणे हा आहे. या उपक्रमाद्वारे गोव्याची उपस्थिती सावथईस्ट आशियाई पर्यटन बाजारात अधिक मजबूत करणे आणि महत्त्वाच्या पर्यटन भागीदारांशी दीर्घकालीन संबंध निर्माण करणे अपेक्षित आहे.

पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणाले, “गोवा नवकल्पना आणि शाश्वततेला स्वीकारत जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून वेगाने पुढे येत आहे. मलेशियातील या रोडशोच्या माध्यमातून आम्ही गोव्याचा एक ताजा, संस्कृतीला जपणारा आणि नव्या पर्यटन प्रवाहांवर आधारलेला चेहरा सादर करू इच्छितो. फिल्स लायक गोवा ही मोहीम या नव्या आत्म्याचे प्रतीक आहे. मलेशियातील ट्रॅव्हल इंडस्ट्रीसोबत मजबूत सहकार्य निर्माण करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

पर्यटन संचालक केदार नाईक म्हणाले, “मलेशिया आमच्यासाठी एक महत्त्वाची बाजारपेठ आहे. हा रोडशो गोव्याच्या भविष्याभिमुख पर्यटन उपक्रमांची ओळख त्या बाजाराला करून देण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. मनोरंजन, वेलनेस, लक्झरी, आणि अनुभवप्रधान पर्यटन अशा विविध ऑफरिंग्सवर आम्ही विशेष लक्ष देत आहोत. नोक्टो ट्युरीझम, जॅट-सॅटींग आणि काल्मकेशन सारखे नवीन ट्रेंड आधुनिक पर्यटकांच्या अपेक्षा आणि गोव्याच्या पर्यटन क्षेत्राची पुढची दिशा स्पष्टपणे दर्शवतात.”

या रोडशोमध्ये अलीकडेच सुरू केलेली फिल्स लायक गोवा मोहीम मुख्य आकर्षण राहील. ही मोहीम गोव्याची संस्कृती, वारसा, निसर्ग, पाककला, वेलनेस आणि पुनरुज्जीवनावर आधारित पर्यटन (रिजेनरेटिव्ह ट्युरीझम) यांचे नवीन आणि आकर्षक कथन सादर करते. आंतरराष्ट्रीय स्तरावर या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत असून मलेशियामध्येही तीच भावना सादर केली जाणार आहे.

रोडशोमध्ये गोवा पर्यटन विभाग नवीन जागतिक ट्रॅव्हल ट्रेंड्सही सादर करणार आहे. ज्या मध्ये नोक्टो ट्युरीझम – सुरक्षित, व्यवस्थापित आणि आकर्षक नाईटलाइफ – संगीत, लाईव्ह शो, मनोरंजन क्षेत्रे आणि वेळोवेळी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा अनुभव. जॅट-सॅटींग – चित्रपट पर्यटनावर लक्ष केंद्रित – गोव्यात शूट झालेल्या चित्रपटांची ओळख, वाढती ओटीटी/फिल्म शूटिंग्स आणि फिल्म-इन्स्पायर्ड ट्रॅव्हलची संधी. काल्मकेशन – हळुवार, शांत आणि उपचारात्मक सुट्ट्यांचा वाढता ट्रेंड – गोव्याच्या शांत हिन्टरलँड्स, वेलनेस रिट्रीट्स, योग/आयुर्वेद केंद्रे आणि निसर्गरम्य विश्रांतीगृहांचा अनुभव, हे सर्व ट्रेंड्स सादर केले जाणार आहेत.

पर्यटन विभागाला या रोडशोमधून फलदायी चर्चा, यशस्वी सहकार्य आणि द्विपक्षीय पर्यटन संबंध अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे. या कार्यक्रमाद्वारे गोवा एक अवश्य भेट द्यावा असा जागतिक दर्जाचा पर्यटन गंतव्यस्थान म्हणून अधिक ठळकपणे उभा राहणार आहे.

Trending

Exit mobile version