गोवा खबर

कतार एक्स्पो २०२५ मध्ये गोवा पर्यटनाकडून पुनरुज्जीवन-आधारित (रिजेनरेटीव्ह) आणि भविष्याभिमुख पर्यटनावर विशेष भर

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा सरकारच्या पर्यटन विभागाकडून कतार ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम एक्स्पो २०२५ मध्ये सहभागी होणार आहे. हा कार्यक्रम २४ ते २६ नोव्हेंबर २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या आंतरराष्ट्रीय मंचावर गोव्याला आपल्या नव्या पर्यटन दृष्टिकोनाची, नाविन्यपूर्ण अनुभवांची, उन्नत सेवांची आणि जागतिक प्रवाहांशी जुळणाऱ्या नवीन संकल्पनांची ओळख करून देण्याची संधी मिळणार आहे.

पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले, “गोवा जबाबदार विकास आणि लक्झरी अनुभवी पर्यटन यांची सांगड घालत आपली पर्यटन ओळख नव्या पद्धतीने घडवत आहे. कतार ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम एक्स्पो २०२५ मध्ये भाग घेऊन वेलनेस, निसर्गातील अनुभव, चित्रपट-आधारित पर्यटन आणि सजीव नाईटलाइफ अशा विविध क्षेत्रांतील गोव्याच्या समृद्ध ऑफरिंग्स सादर करण्यास आम्हाला आनंद होत आहे. जागतिक उद्योग नेत्यांसोबत चर्चा करून आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये गोव्याची उपस्थिती अधिक मजबूत करण्याचा आमचा उद्देश आहे.”

पर्यटन संचालक श्री. केदार नाईक म्हणाले, “कतार एक्स्पो २०२५ ही गोव्याच्या पर्यटन सेवांमधील वाढ आणि नव्या ट्रॅव्हल अनुभवांची माहिती जगासमोर मांडण्यासाठी महत्त्वाची संधी आहे. या सहभागातून आम्ही आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे, सुधारित पर्यटन पायाभूत सुविधा दाखवणे आणि गोव्याला उच्च गुणवत्ता व अस्सल अनुभव देणारे गंतव्यस्थान म्हणून प्रस्थापित करणे हे आमचे ध्येय आहे.”

गोवा आपल्या भविष्याभिमुख आणि विविध पर्यटन पोर्टफोलिओवर विशेष भर देणार आहे. यामध्ये खालील नव्या ट्रॅव्हल ट्रेंड्सवर लक्ष केंद्रित केले जाईल. ज्यामध्ये नोक्टो ट्युरीझम – सुरक्षित, व्यवस्थापित आणि आकर्षक नाईटलाइफ – संगीत, स्थानिक खाद्यसंस्कृती, मनोरंजन क्षेत्रे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी परिपूर्ण रात्र पर्यटन अनुभव. जॅट-सॅटींग – चित्रपट व स्क्रीन पर्यटन – गोव्यात वाढत असलेल्या चित्रपट शूटिंग्स, ओटीटी मालिकांची लोकप्रियता आणि यामुळे वाढणारे फिल्म-इन्स्पायर्ड ट्रॅव्हल. काल्मकेशन – शांत, हळुवार आणि विश्रांती देणाऱ्या सुट्ट्या – वेलनेस रिट्रीट्स, आयुर्वेद थेरपी, निसर्ग-आधारित मुक्काम आणि गोव्याच्या शांत हिन्टरलँडमधील अनुभव ह्या नव्या ट्रॅव्हल ट्रेंड्सवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

या कार्यक्रमात गोवा पर्यटन विभाग विविध पायाभूत सुविधा सुधारणा, डिजिटल पर्यटन सेवा, वारसा क्षेत्रांचे विकासकाम, पाण्यावर आधारित पर्यटन, हिन्टरलँड अनुभव, साहसी उपक्रम आणि समुदाय-आधारित पर्यटन उपक्रमांवरही प्रकाश टाकणार आहे. हे सर्व प्रयत्न पुनरुज्जीवन-आधारित पर्यटनया राज्याच्या मुख्य ध्येयाशी सुसंगत आहेत – ज्यामध्ये पर्यटनामुळे स्थानिकांना फायदा होतो आणि गोव्याचे नैसर्गिक व सांस्कृतिक वारसा जपले जातात.

कतार एक्स्पो २०२५ मध्ये सहभाग घेऊन गोवा आपल्या जागतिक पोहोचीत आणखी वाढ करणार आहे. शाश्वतता, नवकल्पना आणि सांस्कृतिक समृद्धी यांचे सुंदर मिश्रण असलेल्या गोव्याचे आकर्षण जगासमोर अधिक प्रभावीपणे मांडले जाईल. या एक्स्पोमुळे जागतिक पर्यटन भागीदार, उद्योग तज्ञ आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांसोबत अधिक सखोल संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.

Trending

Exit mobile version