गोवा खबर

हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे ची उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Published

on

Spread the love
देशविरोधी कृत्यांना सहाय्य करणार्‍यां स्थानिकांविरुद्ध कठोर कारवाई करा !
गोवा खबर:गोव्यात बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्या यापूर्वी सापडले आहेत. म्हापसा येथे हल्लीच घातलेल्या दरोड्यामध्ये बांगलदेशी घुसखोरांचा प्रमुख सहभाग असल्याचे अन्वेषणात उघड झाले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या आंतकवादीविरोधी पथकाने हल्लीच धर्मांतराच्या कारवाया करणारी टोळी उघडकीस आणताना छांगुर बाबा यांची सहकारी आयेशा यांना जुने गोवे येथे अटक केली होती. हणजूण आणि हडफडे येथे दोन दुकानांमधील ‘एल्.ई.डी.’ फलकांवर ‘पाकिस्तान झिंदाबाद’ फलक झळकले होते. या सर्व घटना राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर आहेत. या सर्व घटनांचे सखोल अन्वेषण करून देशद्रोही, आतंकवादी आणि त्यांचे पाठीराखे यांना शोधून काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समितीने तर गोव्याचे जिल्हाधिकारी श्री. अंकित यादव (आय.ए.एस.) यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या वेळी समितीच्या शिष्टमंडळामध्ये ‘गोमंतक मंदिर महासंघा’चे सचिव सर्वश्री जयेश थळी, निवृत्त कॅप्टन अरविंद कुमार, ‘गोवा हिंदू युवा शक्ती’चे सुजन नाईक आणि विनोद वारखंडकर, ‘भारत माता की जय’ संघटनेचे रामदास सावईवेरेकर, हिंदु जनजागृती समितीचे देविदास गावकर आणि हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे सत्यविजय नाईक यांची उपस्थिती होती.
समितीने निवेदनात म्हटले आहे की दिल्ली येथील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण बाँबस्फोटानंतर पुन्हा एकदा देशातील अंतर्गत सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झालेला आहे. तसेच उच्च शिक्षित धर्मांध मुसलमान व्यक्तीही देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग आढळून आला आहे. दिल्ली स्फोटानंतर तपास संस्थांना मिळालेल्या माहितीनुसार या कटामागील दहशतवाद्यांचे पुढचे लक्ष्य भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रे, जे हिंदू समाजाच्या श्रद्धा व राष्ट्रीय एकतेचे प्रतीके आहेत. तपास संस्था व स्थानिक पोलिसांनी नुकतेच एकत्रितपणे विभिन्न राज्यांतील दहशतवादी यंत्रणा आणि षड्यंत्रे उघडकीस आणली आहेत. विषद्रव्य वापराचा दहशतवादी कटही उघडकीस आला आहे. देशभरात विशेषतः संवेदनशील परिसरात सखोल शोधमोहीम राबवून देशद्रोही आणि पाठीराखे यांच्यावर कायद्यान्वये कठोर कारवाई करावी.
समितीच्या शिष्टमंडळाने पोलीस महासंचालक आलोक कुमार यांची घेतली भेट
यावेळी गोव्याचे पोलीस महासंचालक आलोक कुमार यांची समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांच्याकडे गोव्यातील विविध राष्ट्रविरोधी घटनांवर चर्चा केली. यामध्ये गोव्यात अवैधपणे रहात असलेले बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर, हणजूण आणि हडफडे येथे दोन दुकानांमधील ‘एल्.ई.डी.’ फलकांवर ‘पाकिस्तान झिंदाबाद’ फलक झळकणे, लव्ह जिहादच्या वाढत्या घटना आदी विषयंचा समावेश होता.

Trending

Exit mobile version