गोवा खबर

१५ दिवसांत रस्त्यांची कामे पूर्ण : कामत

Published

on

Spread the love

गोवा खबर : राज्यातील रस्त्यांची खराब अवस्था व वाढत्या अपघातांबाबत सुरू असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर बांधकाममंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले की, १० ते १५ दिवसांत सर्व रस्त्यांची कामे पूर्ण होतील.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की ते स्वतः कामांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत आहेत. जास्तीत जास्त पंधरा दिवसात कामे पूर्ण होतील, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

 नोकरीकांड प्रकरणावर प्रतिक्रिया

पूजा नाईकने मंत्री सुदिन ढवळीकरांवर केलेल्या आरोपांबद्दल विचारले असता कामत म्हणाले, आधी पूर्ण चौकशी होऊ द्या. कोणीही उठतो आणि आरोप करतो. मीही खोट्या आरोपांचा सामना केला आहे.

पोलिस तपास सुरू असून, निष्कर्षाला येण्यापूर्वी राजकीय बयानबाजी योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

Trending

Exit mobile version