गोवा खबर : नोकरी विक्री प्रकरणात मंत्री सुदिन ढवळीकर यांनी स्वतः व कुटुंबासह मंदिरात जाऊन “मी भ्रष्टाचार केला नाही, नोकऱ्यांसाठी पैसे घेतले नाहीत” अशी शपथ घ्यावी, असे थेट आव्हान आम आदमी पक्षाचे नेते अॅड. अमित पालेकर यांनी दिले.
त्यांनी म्हटले की, ढवळीकर यांनी मडकईच्या नवदुर्गा मंदिरात आणि फर्मागुडीतील कटमगाळ दादा स्थानात ही शपथ घ्यावी आणि त्यासाठीची तारीख व वेळ जाहीर करावी.
ढवळीकरांच्या कार्यकर्त्यांनी दोन्ही मंदिरांमध्ये जाऊन AAP कार्यकर्त्यांविरुद्ध “दोषींना शिक्षा व्हावी” असे गाऱ्हाणे घातले. “पण या सर्वात स्वतः ढवळीकर कुठे होते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
त्यांनी सांगितले की पूजा नाईकने स्वतः वकिलाच्या नात्याने मदतीसाठी त्यांच्याशी संपर्क साधला. “मी कुठेही पक्षाचे व्यासपीठ वापरले नाही,” असे ते म्हणाले. पूजा नाईकने AAP कार्यालयाबाहेर माध्यमांसमोर आपली माहिती दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.