गोवा खबर

गोवा ‘मोस्ट अ‍ॅक्सेसिबिल’ राज्य पुरस्काराने सन्मानित

Published

on

Spread the love

 गोवा खबर : भारतातील आघाडीची अ‍ॅक्सेसिबिलिटी संस्था स्वयमने युनेस्को आणि सीआयआय फाउंडेशनच्या सहकार्याने, अ‍ॅक्सेसिबिलिटी क्षेत्रात गोव्याला ‘मोस्ट अ‍ॅक्सेसिबिल स्टेट अवॉर्ड’ देऊन सन्मानित केले. अ‍ॅक्सेसिबिलिटी क्षेत्रात २५ वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने दिल्लीत अशा प्रकारच्या पहिल्या राष्ट्रीय अ‍ॅक्सेसिबिलिटी शिखर परिषदेचे आयोजन केले होते. 

 गोवा सरकारच्या वतीने समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई आणि मुख्यमंत्र्यांचे एपीएस मनोज पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे धोरणकर्ते, व्यावसायिक नेते आणि संबंधित क्षेत्रातील तज्ञ एकत्र येऊन देशाच्या आर्थिक विकासाला, विशेषतः क्रीडा, पर्यटन, वाहतूक आणि आयसीटी क्षेत्रात गती देण्याच्या सुलभतेच्या भूमिकेवर चर्चा केली.

या कार्यक्रमात दिव्यांग व्यक्तींना सक्षम करण्यासाठी आणि कमी गतिशीलता असलेल्या व्यक्तींना सुलभ साधनसुविधा निर्माण करण्यात योगदान देणाऱ्या प्रतिष्ठित संस्थांना स्वयंम पुरस्कार प्रदान केले. संस्थेने आतापर्यंत अनेक संस्थांना पुरस्कार प्रदान केले परंतु एखाद्या राज्याला सुलभता पुरस्काराने सन्मानित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

कमी गतिशीलता असलेल्या व्यक्तींसाठी समावेशक धोरणे तयार करणाऱ्या राज्य सरकारांना मान्यता देण्याच्या या पहिल्याच प्रयत्नात, स्वयंमच्या संस्थापक अध्यक्षा आणि जिंदाल एसएडब्ल्यूच्या एमडी आणि जिंदाल ग्रुपच्या अध्यक्षा सावित्री जिंदाल यांनी गोव्याला सुलभतेच्या क्षेत्रात त्यांच्या अनुकरणीय कार्यासाठी हा पुरस्कार प्रदान केला.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी श्रीमती जिंदाल यांना सुलभतेच्या क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल अभिनंदन करणारा व्हिडिओ संदेश पाठविला आणि जनता आणि पर्यटकांसाठी क्रीडा आणि पर्यटन क्षेत्रातील पायाभूत सुविधा सुलभ करण्यासाठी गोवा सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

Trending

Exit mobile version