गोवा खबर : ग्रामीण विकास खाते, भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या सहकार्याने १३ नोव्हेंबर २०२५ रोजी पणजी येथे दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना २.० सुरू करणार आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सकाळी १०.३० वाजता या योजनेचा शुभारंभ करतील. या कार्यक्रमाला मंत्रिमंडळाचे सदस्य, मंत्रालयाचे अधिकारी, गोव्याचे मुख्य सचिव, खाते प्रमुख आणि विविध सरकारी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील.
ग्रामीण विकास मंत्रालयाने आर्थिकदृष्ट्या मागास आणि गरीब कुटुंबातील १५ ते ३५ वयोगटातील युवकांना उच्च दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण देऊन नोकरीच्या उपलब्ध करणे हा ग्रमीण कौशल्य आणि प्लेसमेंट कार्यक्रमाचा उद्देश आहे. ही योजनेअंतर्गत समावेशक कौशल्यावर भर देतात ज्यामध्ये आरक्षण आणि दिव्यांग व्यक्ती आणि इतर असुरक्षित गटांचा सहभाग सुनिश्चित करण्याची तरतुद आहे.