गोवा खबर

गोमंतकीयांची घरे मोडणार नाही, तर कायदेशीर करणार : मुख्यमंत्री

Published

on

Spread the love

गोवा खबर: मूळ गोमंतकीयांची कोमुनिदाद किंवा सरकारी जमिनीवरील जुनी घरे सुरक्षित ठेवून कायदेशीर करणार आहोत, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

शिरोडा बाजार येथे झालेल्या ‘माझे घर’ योजनेच्या अर्ज वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, थोडी रक्कम भरल्यावर कोमुनिदाद जमिनीवरील घरेही कायदेशीर होणार आहेत. पंचायत कार्यालयात अर्ज प्रक्रिया सुरू आहे.

सहकारमंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले, सहा महिन्यांच्या आत सर्वांना घराच्या सनदा मिळतील. मुख्यमंत्री यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ४० हजार रुपयांपर्यंत मदत देण्याचीही घोषणा केली.

Trending

Exit mobile version