गोवा खबर

माझे घर योजना सामान्यांच्या हितासाठी : मुख्यमंत्री सावंत

Published

on

Spread the love

गोवा खबर : सरकारला कोणाच्याही घरावर कारवाई करायची नव्हती. सामान्यांच्या हिताचा विचार करून त्यांची घरे नियमित करण्यासाठीच ‘माझे घर’ योजना राबवली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

साळगाव मतदारसंघातील गिरी येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी या योजनेअंतर्गत अर्ज वितरित केले. “कुळ आणि मुंडकार कायद्यानंतर ही सर्वात मोठी जनहिताची योजना आहे, असेही त्यांनी नमूद केले.

‘त्या’ ४० घरांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री म्हणाले, भविष्यात योग्य विचार करून या घरांचा प्रश्न सोडवला जाईल.

खासदार सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले की, या योजनेमुळे लोकांची भीती संपली असून, विरोधकही आता या योजनेत सहभागी होत आहेत.

Trending

Exit mobile version