गोवा खबर

घरगुती आणि कमी दाबाच्या वीज ग्राहकांना दरवाढ नाही : ढवळीकर यांचे स्पष्टीकरण

Published

on

Spread the love

गोवा खबर : राज्यातील सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय वीज ग्राहकांना दिलासा देत वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केले की, घरगुती आणि कमी दाबाच्या वीज वापरकर्त्यांसाठी ‘टाइम ऑफ द डे’ दर प्रणाली लागू केली जाणार नाही.

काँग्रेस व आपने दरवाढीच्या मुद्द्यावर विद्युत भवनवर धडक दिल्यानंतर मंत्री ढवळीकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की, दरवाढीचा कोणताही नवा निर्णय झालेला नाही. माध्यमांनी चुकीचा अर्थ लावला आहे. डिसेंबरपासून स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू होईल, पण त्यामुळे सर्वसामान्यांवर कोणतीही झळ बसणार नाही.

ढवळीकर यांनी सांगितले की, ‘टाइम ऑफ द डे’ योजना फक्त औद्योगिक ग्राहकांसाठी २०१५ पासून अस्तित्वात आहे आणि त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

मध्यमवर्गीय कुटुंबे महिन्याला साधारणपणे ३०१ ते ४०० युनिट वीज वापरतात. त्यांच्या दरात फक्त ५ टक्के वाढ झाली आहे. ४०० पेक्षा जास्त युनिट वापरणाऱ्यांसाठी वाढ ६.९ टक्के आहे. हे वाढीचे प्रमाण अत्यल्प आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

त्यांनी सांगितले की, स्मार्ट मीटर योजनेची सुरुवात सरकारी कार्यालयांपासून केली जाणार आहे. घरगुती वापरकर्त्यांसाठी कोणतीही दरवाढ होणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

Trending

Exit mobile version