गोवा खबर

सेपॅक टॅकरोला मिळणार सरकारी पाठबळ

Published

on

Spread the love
  • मुख्यमंत्री सावंत : खेळ राज्यभर पोहोचवू, मनोहर पर्रीकर स्टेडियम वातानुकूलित होणार

गोवा खबर : गोव्यातील सेपॅक टॅकरो खेळाडूंना आता सरकारकडून प्रोत्साहन मिळणार आहे. हा खेळ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि नियमित स्पर्धा आयोजित करण्यासाठी सरकार मदत करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

३५ वी राष्ट्रीय सेपॅक टॅकरो चॅम्पियनशिप गुरुवारी नावेली येथील मनोहर पर्रीकर स्टेडियममध्ये मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते सुरू झाली. या स्पर्धेत २८ राज्यांतील ६५० खेळाडू सहभागी झाले आहेत.

कार्यक्रमात माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, आमदार उल्हास तुयेकर, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, मनोहर पर्रीकर स्टेडियम पुढील वर्षभरात वातानुकूलित केले जाईल. तसेच मडगाव येथील ‘दिंडी’ उत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा देण्याचा प्रस्तावही विचाराधीन आहे.

खेळाडूंना शुभेच्छा देत त्यांनी सांगितले की, सेपॅक टॅकरो सारख्या खेळांमुळे युवा पिढी शारीरिकदृष्ट्या मजबूत होत असून, राज्याचे नाव देशभरात उजळते आहे.

Trending

Exit mobile version