गोवा खबर

सत्तरीतील झेडपीच्या चारही जागा जिंकण्याचा राणे यांचा निर्धार

Published

on

Spread the love

गोवा खबर : सत्तरी तालुका आणि उसगाव मिळून असलेल्या चार झेडपी मतदारसंघांमध्ये यंदाही प्रचंड मताधिक्याने विजय मिळवण्याचा निर्धार शुक्रवारी झालेल्या बैठकीत करण्यात आला.

बैठकीत वाळपईचे आमदार आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सत्तरी तालुक्यातील झेडपी सदस्य, सरपंच, उपसरपंच, पंच आणि प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विचारधारा घरोघर पोहचवूया आणि आगामी झेडपी निवडणुकांसाठी आतापासूनच कामाला लागूया.

 सत्तरी आणि उसगावमधील युवकांची शक्ती हीच आपली खरी ताकद आहे. त्यांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू असून, बेरोजगारीचा प्रश्नही सोडवला जाईल. केंद्र आणि राज्य दोन्ही ठिकाणी भाजपचे सरकार असल्याने विकासकामे जलदगतीने पूर्ण होत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

या बैठकीस वाळपई नगराध्यक्ष, झेडपी सदस्य सगुण वाडकर, तसेच पिसुर्ले, खोतोडे आदी पंचायतींचे सरपंच उपस्थित होते. बैठकीनंतर मंत्री राणे आणि उपस्थित कार्यकर्त्यांनी विजयी चिन्ह दाखवत आत्मविश्वास व्यक्त केला.

Trending

Exit mobile version