गोवा खबर

६९ व्या राष्ट्रीय शालेय खेळांसाठी निवड चाचण्या

Published

on

Spread the love

गोवा खबर : ६९ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२५ साठी गोवा राज्य संघांची निवड करण्यासाठी कांपाल, पणजी येथील क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयातर्फे तायक्वांदोमध्ये १४ आणि १९ वर्षाखालील मुलींच्या निवड चाचण्या घेण्यात येणार आहे.

निवड चाचण्या १४ वर्षाखालील मुलींसाठी १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत आणि २३ ऑक्टोबर रोजी १९ वर्षांखालील मुलींसाठी सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत पणजीतील कांपाल येथील इनडोअर सभागृहात होतील. यासाठी प्रभारी रोहिदास घाडी, एपीईओ, मोबाईल क्रमांक ९०४९९२१२२८ आणि संजय, शिरोडकर, झेडएसओ डीएसवायए – ९३२६५७०८०२ असतील.

 १४ वर्षांखालील मुलींसाठी पात्रता अशी आहे की खेळाडूंचा जन्म ०१/०१/२०१२ रोजी किंवा त्यानंतर आणि १९ वर्षांखालील मुलींचा जन्म ०१/०१/२००७ रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा. निवडलेल्या खेळाडूंना पात्रता अर्जासह डॉक्टरांकडून वय पडताळणी चाचणी प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

Trending

Exit mobile version