गोवा खबर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रवी नाईक यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले

Published

on

Spread the love

गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा सरकारमधील मंत्री रवी नाईक यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

गोव्याच्या विकास यात्रेत महत्त्वपूर्ण योगदान देणारे रवी नाईक हे एक अनुभवी प्रशासक आणि समर्पित लोकसेवक म्हणून नेहमीच स्मरणात राहतील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. विशेषतः समाजातील वंचित आणि शोषितांना सक्षम करण्यासाठी नाईक यांना विशेष तळमळ वाटत होती, असे त्यांनी म्हटले आहे. 

एक्स समाजमाध्यमवरील पोस्ट मध्ये पंतप्रधानांनी लिहिले आहे : “गोवा सरकारमधील मंत्री रवी नाईक यांच्या निधनाने व्यथित झालो आहे. गोव्याच्या विकास यात्रेत महत्त्वपूर्ण योगदान देणारे एक अनुभवी प्रशासक आणि समर्पित लोक सेवक म्हणून  ते नेहमीच स्मरणात राहतील. विशेषतः समाजातील वंचित आणि शोषितांना सक्षम करण्यासाठी नाईक यांना विशेष तळमळ वाटत होती, या दुःखद प्रसंगी त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या समर्थकांच्या दुःखात मी सहभागी आहे. ओम शांती.”

Trending

Exit mobile version