गोवा खबर

सहकार क्षेत्राची उलाढाल १३,५३५ कोटींवर

Published

on

Spread the love
  • १४ नोव्हेंबरपासून राज्यात सहकार सप्ताह : मंत्री सुभाष शिरोडकर

गोवा खबर : राज्यातील सहकार संस्थांनी आर्थिक क्षेत्रात मोठी झेप घेतली असून, २०२३-२४ मध्ये त्यांची एकूण उलाढाल तब्बल १३,५३५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे, अशी माहिती सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

१४ ते २० नोव्हेंबर या कालावधीत राज्यात सहकार सप्ताह साजरा केला जाणार असून, या काळात विविध कार्यक्रम आयोजित केले जातील.

मंत्री शिरोडकर म्हणाले की, “या सप्ताहात विद्यार्थ्यांना सहकार क्षेत्राची ओळख करून देण्यासाठी त्रिभूवन विद्यापीठाशी सामंजस्य करार करण्यात येईल.”

राज्यातील २ ते ३ लाख लोक सहकार चळवळीत सक्रीय असून अनेक संस्था आता वित्तीय मर्यादांच्या पलीकडे जाऊन पेट्रोल पंप, क्रीडांगण इत्यादी प्रकल्प राबवत आहेत.

राज्यातील सहकार चळवळ आणखी बळकट होण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरेल, असे मंत्री शिरोडकर यांनी नमूद केले.

Trending

Exit mobile version