गोवा खबर

पर्पल फेस्टमधील दिव्यांग सहभागींनी जलक्रीडांमध्ये सहभाग नोंदवत उसळविल्या स्वातंत्र्याच्या लाटा

Published

on

Spread the love
दिव्यांग व्यक्ती प्रमुख साहसी क्रीडाप्रकारांमध्येही सहभागी होऊ शकतात, हे अ‍ॅडॉप्टिव्ह पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षित साह्यपथकासमवेत पर्पल फेस्टने केले परिभाषित
गोवा खबर:करंजाळे-तळेगाव येथील राष्ट्रीय जलक्रीडा संस्थेमध्ये शांतीमध्ये क्रांती घडत असल्याची अनुभूती आली. आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट २०२५चा भाग म्हणून, पॅरासेलिंग, जेट स्काइंग आणि स्कूबा डायव्हिंग अशा विविध साहसी जलक्रीडा प्रकारांमध्ये दिव्यांगजनांनी सहभाग घेत सादर केलेले कौशल्य पाहताना पाण्याच्या लाटांमध्ये हास्याचे, आनंदाचे आणि जयजयकाराचे तरंग असा अनोखा मिलाफ अनुभवायला मिळाला.
अर्थात, हा उपक्रम साहसाबद्दल होतो, परंतु या क्रीडाउपक्रमाच्या माध्यमातून सुलभतेचे महत्त्व यावर लक्ष केंद्रित केले गेले. संरचित सुरक्षा उपाययोजना आणि प्रशिक्षित अ‍ॅडॉप्टिव्ह साह्य पथक यांच्या साथीने, हा उपक्रम साहसी खेळांना एक समावेशक अनुभव म्हणून सादर केले, आणि अशा प्रकारच्या साहसाचा थरारक अनुभव केवळ काहीपुरताच राखीव नसल्याचेही या उपक्रमाने दाखवून दिले.
पारंपरिक सुलभता मोहिमेमध्ये पायाभूत सुविधांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले जात असते, मात्र आजच्या या उपक्रमामध्ये दिव्यांग व्यक्तींचा सक्रीय सहभागाला प्राधान्य दिले गेले. या उपक्रमामध्ये दिव्यांगांसाठी वापरसुलभ हार्नेस, रॅम्प अशा सुविधांसह खास मार्गदर्शक नियमावली बनवून दिव्यांग व्यक्तींना या साहसी जलक्रीडा प्रकारांत केवळ सहभागीच नाही, तर स्वतंत्रपणे सहभागी होण्यासाठी सक्षम करता येते हे दाखवून दिले.
या उपक्रमाचे पर्यवेक्षण करणारे गोवा राज्याचे समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई हे समावेशक पर्यटनासाठी हा उपक्रम एक निर्णायक क्षण असल्याचे म्हणतात.
“दिव्यांग व्यक्ती या स्कूबा डायव्हिंग किंवा पॅरासेलिंगमध्ये सहभागी होतील, अशी कल्पना कोणीही केली नव्हती. आज, योग्य, समावेशक पायाभूत सुविधा आणि हेतूने, हे शक्य झाले आहे. प्रत्येक साहसी क्रीडाप्रकाराचा दिव्यांगजनांनाही आनंद, अनुभव घेता येईल अशा प्रकारे गोवा राज्य समावेशक पर्यटनाचे एक आदर्श म्हणून उभे राहावे, अशी आमची इच्छा आहे,” असे समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले.
बहुतांश सहभागींसाठी, साहसी क्रीडाप्रकारात सहभागाचा पहिलाच अनुभव होता. त्यांच्या उत्साहाला कोठेही मुरड न घालता, तांत्रिक मार्गदर्शन प्रदान करणाऱ्या पर्यवेक्षी प्रशिक्षकांद्वारे प्रमुख जलक्रीडा प्रकारासाठी आवश्यक अशा प्रकारे मनोबल वाढविणे, उत्साह कायम ठेवणे आणि कोणतेही अतिसंरंक्षण न पुरवत योग्य वातावरण उपलब्ध केले गेले.
‘सितारे जमीं पर’ या हिट बॉलिवूड चित्रपटातील कलाकारांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित राहून सहभागींसोबत या थरारक अनुभवांचा आनंद घेतला.
“हा अनुभव आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त होता. आम्ही पहिल्यांदाच पॅरासेलिंग आणि जेट स्काइंग केले. नियमित साहसी उपक्रमाप्रमाणेच हे प्रकारही तितकेच थरारक आणि आव्हानात्मक आहेत,” असा अनुभव या चित्रपटातील कलाकार नमन मिश्रा यांनी व्यक्त केला.
अशा क्रीडा उपक्रमात प्रथमच सहभागी झालेल्यांपैकी १४ वर्षांचा प्रथमेश सिन्हा हा एक. अलिम्को आणि थिंकरबेलचा प्रेरक वक्ता आणि ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असलेला प्रथमेश सिन्हा आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट २०२५ मध्ये युवा प्रतिनिधी म्हणून सहभागी झाला आहे. “मी आयुष्यात पहिल्यांदाच जलक्रीडा उपक्रमात सहभागी झालो,” असे त्याने आनंदाने सांगितले. “येथील सुलभता ही केवळ प्रतिकात्मक नाही तर व्यावहारिक आहे. स्थापित केलेल्या प्रणालींमुळे आम्हाला केवळ प्रेक्षक न राहता, या थरारक अनुभवांचा आनंद घेण्यासाठी प्रत्यक्ष व स्वतंत्रणे सहभागी होता आले.”
हा साहसी क्रीडा उपक्रम टिंकेश अ‍ॅबिलिटी फाउंडेशनच्या समन्वयाने राबविला गेला. ही संस्था वापरसुलभ उपकरणे उपलब्ध करते आणि समावेशक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी साह्यपथकाला प्रशिक्षण देते.
“आम्ही साहसी खेळांमधील सामान्य अडथळे दूर करण्यासाठी हा उपक्रम विकसित आहे. यापूर्वी शेकडो लोकांनी अशा उपक्रमांत सहभाग घेऊन, ही केवळ सुरवात असल्याचे दाखवून दिले आहे,” असे मत फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा सिडेनस्ट्रिका गौतम यांनी मांडले.
हा उपक्रम संपतात, या उपक्रमातील केवळ नावीन्यता आणि वेगळेपणच लक्षात राहिली नाही, तर सहभागी कोणत्याही भीतीशिवाय सहभागी होऊ शकतात, हसत हसत स्पर्धा करतात आणि आनंद साजरा करतात असा सामान्य अनुभव यावेळेलाही पाहायला मिळाला.
या उपक्रमाचे खरे यश त्याच्या दृष्टिकोनात आहे, त्याच्या देखाव्यामध्ये नाही. व्यावहारिक सुलभता, स्वतंत्र सहभाग आणि योग्य समर्थन प्रणालींना प्राधान्य देऊन, आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट २०२५ ने साहसी खेळांना खरोखर समावेशक बनवण्याचा मार्ग मोकळा केला आहे. पूर्वी अशक्य वाटणाऱ्या कामामध्येही योग्य नियोजन, दृष्टिकोन आणि पायाभूत सुविधा यांच्या साथानी दिव्यांग व्यक्ती पूर्णपणे सहभागी होऊ शकतात हे या उपक्रमाने दाखवून दिले आहे. तसेच, गोव्याच्या किनारी पर्यटनाच्या पलीकडे समावेशक पर्यटन आणि अनुकूल मनोरंजनासाठी एक मापदंड या उपक्रमातून स्थापित होत आहे.

Trending

Exit mobile version