गोवा खबर

‘माझे घर’ योजनेसाठी भाजपची राज्यभर जागृती मोहीम

Published

on

Spread the love
  • सोमवारपासून मये व डिचोली येथे प्रारंभ : मुख्यमंत्री

गोवा खबर : राज्य सरकारची ‘माझे घर’ योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्याबाबत जनजागृतीसाठी भाजपकडून राज्यभर विशेष मोहीम सुरू करण्यात येत आहे. या मोहिमेला सोमवारपासून (13 ऑक्टोबर) मये आणि डिचोली येथे सुरुवात होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

पणजीत झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, १९७२ पासून सरकारी किंवा कोमुनिदाद जागेवर बांधलेली घरे सरकार ‘माझे घर’ योजनेतून नियमित करणार आहे. अर्ज सोमवारपासून उपलब्ध होतील. लोकांनी आपल्या घराची कागदपत्रे जोडून अर्ज सादर करावेत.

प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले, ही योजना गोमंतकीयांसाठी खऱ्या अर्थाने सरकारने दिलेली दिवाळी भेट आहे. यामुळे अनेकांची घरे नियमित होतील. भाजप कार्यकर्ते योजना, जीएसटी लाभ आणि आत्मनिर्भर भारतसारख्या उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवतील.

मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले, भाजप पक्ष एकसंघ असून, आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यातील वादाचा भाजपवर कोणताही परिणाम होत नाही. पक्ष नेहमीच निवडणुकीसाठी सज्ज असतो.

Trending

Exit mobile version