गोवा खबर

स्टेकहोल्डर्स आले एकत्रित : गोवा पर्यटन विभागाने जागतिक पर्यटन दिन 2025 चा महिनाभराचा उत्सव विविधता आणि सर्वसमावेशक पर्यटन साजरा करत यशस्वीरीत्या केला पूर्ण

Published

on

Spread the love

गोवा सरकारचा पर्यटन विभाग, ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा (TTAG) आणि स्काल इंटरनॅशनल गोवा यांच्या सहकार्याने आयोजित जागतिक पर्यटन दिन 2025 चा महिनाभर चाललेला उत्सव इएसजी पणजी येथे झालेल्या हेरिटेज फॉर सस्टेनेबिलिटी फिल्म फेस्टिव्हलच्या भव्य समारोपाने यशस्वीरीत्या संपन्न झाला. या एकदिवसीय फेस्टिव्हलमध्ये गोव्याच्या वारसा आणि संस्कृतीशी निगडित प्रभावी चित्रपटांची निवडक मालिका सादर करण्यात आली.

या उत्सवाबद्दल बोलताना मा. पर्यटन मंत्री श्री. रोहन ए. खंवटे म्हणाले, “जागतिक पर्यटन दिन 2025 चा आमचा महिनाभराचा उत्सव पारंपरिक कार्यक्रमांच्या चौकटीपलीकडे गेला. यात युवक, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींनीही सक्रिय सहभाग घेतला, जो गोवा उभारू पाहत असलेल्या सर्वसमावेशक पर्यटन मॉडेलचे प्रतिबिंब आहे.

गोव्यातील पर्यटन आता केवळ समुद्रकिनारे किंवा मनोरंजनापुरते मर्यादित राहिलेले नाही. हे शिकण्याचे, योगदान देण्याचे आणि आपण जिथे जातो त्या ठिकाणाला आधीपेक्षा अधिक चांगले बनवण्याचे साधन आहे. यावर्षीचे उपक्रम याच तत्त्वांचे प्रतीक आहेत. पुढे जाताना आम्ही गोव्याला पुनरुत्थानशील तत्त्वांवर आधारित जागतिक दर्जाचे, वर्षभराचे पर्यटनस्थळ बनवण्याचा निर्धार केला आहे, जिथे प्रत्येक पर्यटकाचा अनुभव आमच्या समुदायांना बळकट बनवेल, संस्कृती जपेल आणि पर्यावरणाचे संवर्धन करेल.”

पर्यटन संचालक श्री. केदार नाईक म्हणाले, “या महिनाभराच्या उत्सवातील प्रत्येक उपक्रमाचा केंद्रबिंदू ‘Goa Beyond Beaches’ हा होता, ज्यातून गोव्याचे खरे आणि वैविध्यपूर्ण स्वरूप प्रदर्शित झाले. स्थानिक समुदाय, होमस्टे मालक, युवक आणि महिला उद्योजकांना सहभागी करून घेत आम्ही केवळ अनोखे अनुभव देत नाही, तर पर्यटन क्षेत्राचा कणा असलेल्या लोकांना सक्षमही करत आहोत. भागधारक, सरकार आणि स्थानिक समाज यांच्यातील हे सहकार्य गोव्याचे पर्यटन अधिक सर्वसमावेशक, नाविन्यपूर्ण आणि शाश्वत ठेवेल.”

हेरिटेज फॉर सस्टेनेबिलिटी फिल्म फेस्टिव्हलची सुरुवात Postcards from Goa, Islands on Island, Sashticho Koddo, Bread and Belonging, Kharvan, The Birdman of Chorao, Caazu, I Am Nothing, Sadabahar, Conversations on Oviyos, Written in Corners, Petroglyphs आणि Manohar Rai Sardesai या चित्रपटांच्या प्रदर्शनाने झाली. या दरम्यान विन्स कोस्टा, एल्सा डी सूझा, सोनिया फिलिंटो, नलिनी एल्विनो डी सूझा, रोनक कामत आणि शायस्ता थापर यांसारख्या चित्रपट निर्मात्यांशी झालेल्या संवादांनी कार्यक्रम अधिक समृद्ध झाला.

या महिन्याच्या सुरुवातीपासूनच गोव्याच्या पुनरुत्थानशील पर्यटन, समुदाय सहभाग, कौशल्य विकास आणि वारसा संवर्धनावर लक्ष केंद्रित करणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. संपूर्ण सप्टेंबर महिन्यात स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यांपलीकडे जाऊन गोव्याचे लपलेले खजिने अनुभवण्याचे आमंत्रण देण्यात आले. यामध्ये बायोल्युमिनेसंट फॉरेस्ट वॉक, कायकिंग आणि रिव्हर क्रूझ, शॉरांव बेटावर सायकलिंग टूर, आग्वाद आणि माँत सांतो येथे हेरिटेज वॉक तसेच ब्रेड बनवणे आणि नारळाच्या बागायतीचा अनुभव अशा उपक्रमांचा समावेश होता. प्रत्येक कार्यक्रमात गोव्याच्या वैविध्यपूर्ण पर्यटन ऑफरिंग्ज आणि निसर्ग व समुदाय जपणारे पुनरुत्थानशील मॉडेल अधोरेखित झाले.

27 सप्टेंबर रोजी ग्रँड हयात गोवा येथे राज्यातील सर्वात मोठा टूरीझम स्टेकहोल्डर्स मीट आयोजित करण्यात आली. यात हॉटेल व्यावसायिक, ट्रॅव्हल ट्रेड भागीदार, शैक्षणिक संस्था, उद्योग नेते आणि तरुण उद्योजक एकत्र येऊन सहकार्याचे मार्ग, नव्या बाजारपेठा आणि पर्यटन क्षेत्राच्या शाश्वत वाढीवर चर्चा केली.

इएसजी येथे झालेल्या एकदिवसीय हेरीटेज फॉर सस्टेनेबिलीटी फिल्म फेस्टिव्हलने उत्सवाची रंगतदार सांगता झाली. ह्या फिल्म फेस्टिव्हलला विद्यार्थ्यांचा, चित्रपट निर्मात्यांचा, इन्फ्लुएन्सर्सचा आणि पर्यटन रसिकांचा उत्साही प्रतिसाद मिळाला. या फेस्टिव्हलमध्ये गोव्याचे ग्रामीण आणि किनारी अनुभव, हेरिटेज वॉक्स, स्थानिक पाककला, होमस्टे आणि समुदाय-आधारित उपक्रम यांचे सुंदर दर्शन घडले. तसेच युवा चित्रपट निर्माते आणि युवा टुरिझम क्लब सदस्यांना गोव्याच्या पर्यटनाच्या भविष्यासंदर्भातील आपली दृष्टी सादर करण्याचे व्यासपीठ मिळाले.

गोवा पर्यटन विभागाने सर्व भागधारक, विद्यार्थी, चित्रपट निर्माते आणि उद्योग भागीदारांचे मनःपूर्वक आभार मानले ज्यांच्या सहभाग आणि सहकार्यामुळे जागतिक पर्यटन दिन 2025 चा महिनाभराचा उत्सव इतका यशस्वी ठरला.

Trending

Exit mobile version