गोवा खबर : अत्यंत प्रतिक्षित #NextGenGST मोहीम आज कावळेकर सुपर मार्केट, पेन्हा दे फ्रान्क येथे माननिय पर्यटन मंत्री आणि पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आली.
ही मोहीम पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या नेक्स्ट जनरेशन GST सुधारणा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि रहिवासी, दुकानदार तसेच उद्योजकांना नवीन GST प्रणालीची ओळख करून देण्यासाठी राबवली जात आहे. यामुळे वस्तू आणि सेवा कर (GST) बद्दलची लोकांची समज वाढवणे आणि व्यवसाय व ग्राहकांसाठी अनुपालनाची प्रक्रिया अधिक सोपी करणे हा उद्देश आहे.
उद्घाटन प्रसंगी मंत्री रोहन खंवटे म्हणाले, “नेक्स्ट जेन GST हा करप्रक्रियेला डिजिटल पद्धतीने अधिक पारदर्शक, सोपा आणि आधुनिक बनवतो. अशा मोहिमा स्थानिक उद्योजक, व्यापारी आणि सेवा पुरवठादारांना सक्षम करतात. त्यामुळे करव्यवस्थेत अधिक जबाबदारी, कार्यक्षमता आणि लोकांचा सहभाग सुनिश्चित होईल.”
या मोहिमेत स्थानिक दुकानदार, लघु व्यावसायिक आणि नागरिकांनी सहभाग घेतला. त्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत, हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, जो व्यवसाय वातावरण अधिक माहितीपूर्ण आणि डिजिटल पद्धतीने सक्षम करेल असे म्हटले
अशा उपक्रमांमुळे पर्वरी मतदारसंघ स्वतःला एक सक्रिय आणि प्रगतिशील क्षेत्र म्हणून सादर करत आहे, जिथे नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करणाऱ्या धोरणांबाबत योग्य वेळी माहिती मिळते आणि जागृता निर्माण होते.