गोवा खबर

स्वच्छ भारत’ संकल्पनेसाठी प्रत्येकाची साथ आवश्यक : आरोग्यमंत्री राणे

Published

on

Spread the love

गोवा खबर : स्वच्छ, निरोगी व शाश्वत गोवा उभारण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने स्वच्छतेत सक्रिय भूमिका बजावणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केले.

“स्वच्छता ही सेवा – एक दिन, एक घंटा, एक साथ” या देशव्यापी मोहिमेअंतर्गत गुरुवारी पणजी कदंब बसस्थानक येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात नागरिक, स्वच्छता कर्मचारी तसेच विविध अधिकारी यांचा सहभाग होता. स्वतः आरोग्यमंत्री राणे यांनी हातात झाडू घेऊन परिसराची स्वच्छता केली आणि उपस्थितांना आपल्या घराप्रमाणे सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले.

राणे म्हणाले की, स्वच्छतेच्या माध्यमातून केवळ परिसर सुंदर होत नाही तर आरोग्यदायी जीवनशैलीलाही चालना मिळते. त्यामुळे ‘स्वच्छ भारत’ या राष्ट्रीय संकल्पनेला बळकटी देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

Trending

Exit mobile version