गोवा खबर

टॅक्सी धोरण दबावाने राबविले जाणार नाही : मंत्री गुदिन्हो

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोव्यातील अॅग्रिगेटर टॅक्सी पॉलिसीवरून निर्माण झालेल्या चर्चेला प्रतिसाद देताना वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी स्पष्ट केले की, हे धोरण कोणावरही जबरदस्ती लादले जाणार नाही. सध्या याचा केवळ मसुदा तयार असून सर्व टॅक्सीचालक, संघटना आणि संबंधित हितधारक यांच्या मतांचा विचार करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल.

गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना गुदिन्हो म्हणाले की, सरकारचा उद्देश टॅक्सीचालकांच्या उपजीविकेवर गदा आणणे नसून, पर्यटन क्षेत्राला बळ देत पारदर्शक व ग्राहकस्नेही सेवा उपलब्ध करणे हा आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून टॅक्सी क्षेत्र अधिक शिस्तबद्ध करण्याची ही संधी असून, आवश्यक त्या सुधारणा चर्चेतून केल्या जातील.

दरम्यान, “सेवा पंधरवडा” उपक्रमांतर्गत शनिवारी (दि. २७) सकाळी ९.३० वाजता राज्यातील नोडल अधिकारी व स्वयंपूर्ण मित्र पंचायत व नगरपालिकांमध्ये जाऊन लोकांची गार्हाणी ऐकतील. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आभासी माध्यमातून जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत.

Trending

Exit mobile version