गोवा खबर

सनातन संस्थेवर बंदी घालण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयातून निकाली

Published

on

अभय वर्तक
Spread the love

गोवा खबर : सनातन संस्थेला ‘दहशतवादी संघटना’ ठरवून तिच्यावर बंदी घालण्यासाठी वर्ष २०११ मध्ये दाखल करण्यात आलेली जनहित याचिका अखेर मागे घेण्याची नामुष्की याचिकाकर्त्यांवर ओढवली. तब्बल १४ वर्षे चाललेल्या या न्यायालयीन संघर्षात, याचिकाकर्त्यांना संस्थेच्या विरोधात दहशतवादाचा एकही पुरावा सादर करता आला नाही.

याचिकेची सुनावणी घेण्यासाठी कोणताही आधार नाही. तुम्ही याचिका मागे घेता कि आम्ही ती फेटाळून लावू, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर याचिकाकर्त्यांना आपली याचिका बिनशर्त मागे घेतली. हा केवळ सनातन संस्थेचा विजय नसून, सत्य, न्याय आणि धर्मनिष्ठा यांचा विजय आहे. आमची न्यायदेवतेवर श्रद्धा होती, ती आज पुन्हा एकदा सत्यात उतरली. सर्वशक्तीमान भगवंत, न्यायदेवता, आमचे गुरु आणि या प्रकरणात आमच्या बाजूने लढणारे अधिवक्ते यांच्याबद्दल कृतज्ञ आहोत, असे सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी या निकालानंतर म्हटले आहे.

Trending

Exit mobile version