गोवा खबर

जीटीडीसीतर्फे 28 सप्टेंबर रोजी तोणीर धबधब्यावर पावसाळी ट्रेकिंग मोहिम

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा पर्यटन विकास महामंडळ  (जीटीडीसी) तर्फे २८ सप्टेंबर रोजी सत्तरीतील तोणीर धबधब्यावर पावसाळी ट्रेकिंग मोहिम आयोजित करण्यात येणार आहे.

हा ट्रेक सुमारे 8 किलोमीटर अंतराचा असून सोपेपणा आणि रोमांच यांचा सुंदर संगम आहे. यात सहभागी निसर्गरम्य म्हादई परिसरातून जातील, नदी पार करतील आणि पडलेल्या झाडांवरून मार्ग काढतील. सुमारे दीड तास जलद गतीने चालल्यानंतर तोणीर धबधब्यापर्यंत पोहोचता येईल. या प्रवासातून सहभागी निसर्गाशी जवळून संवाद साधू शकतील.

ही मोहीम साहस निसर्गाची आवड असलेल्या सर्वांसाठी खुली आहे. प्रवासाची सोय पर्यटन भवन, पट्टो येथून केली जाईल. सकाळी 8:00 वाजता बस सुटेल. या ट्रेकसाठी नोंदणी शुल्क१४०० आहे.

सहभागींनी अतिरिक्त कपड्यांची जोडी, रेनकोट, योग्य ट्रेकिंग बूट, स्नॅक्स दूरबीण बरोबर आणणे आवश्यक आहे. सुरक्षिततेसाठी निसर्गाचे जतन करण्यासाठी धूम्रपान मद्यसेवनास परवानगी नसेल.

नोंदणी अधिक माहितीसाठी इच्छुकांनी अनिल दलाल (जीटीडीसी) यांच्याशी 9422057704 / 8379022215 ह्या क्रमांकावर संपर्क साधावा.

ह्या मोहीमे अंतरगत सहभगी झालेल्याना गोव्याच्या पावसाळी निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्याची त्याच्या समृद्ध वारशाची ओळख करून देण्याची सुव्यवस्थित सुरक्षित संधी मिळणार आहे.

Trending

Exit mobile version