गोवा खबर : वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) च्या 84 व्या स्थापना दिन सोहळ्याचा भाग म्हणून, ‘राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था’ (NIO), गोवा, 26 सप्टेंबर रोजी ‘ओपन डे’ आयोजित करणार आहे.
हा कार्यक्रम एनआयओच्या दोना पावला येथील परिसरामध्ये सकाळी 9:30 ते दुपारी 3:00 या वेळेत होईल. या सोहळ्याचा भाग म्हणून, एनआयओ ने राज्यातील विद्यार्थ्यांना सागरी संसाधने आणि उपकरणांवरील प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे, जिथे सागरी संशोधनातील वैज्ञानिक कार्यांचे प्रदर्शन केले जाईल. संस्था विद्यार्थ्यांसाठी समुद्र विज्ञानाशी संबंधित अनेक चित्रपट प्रदर्शित करेल आणि ‘समुद्र विज्ञानातील करिअर’ (Careers in Oceanography) या विषयावर एक व्याख्यानही आयोजित केले जाईल.
‘आत्मनिर्भर भारता’चे उद्दिष्ट साध्य करत, वैज्ञानिक संशोधन आणि तांत्रिक विकासाद्वारे नाविन्यपूर्ण, स्पर्धात्मक आणि शाश्वत उपाय विकसित करून भारतातील जीवनाची गुणवत्ता वाढवणे, हे CSIR चे ध्येय आहे.