गोवा खबर

राज्यपालांची आग्वाद पोर्ट आणि जेल कॉम्प्लेक्सला भेट

Published

on

Spread the love

गोवा खबर : नव्याने नियुक्त झालेले राज्यपाल पुशापती अशोक गजपती राजू यांनी गुरुवारी शिकेरी येथील 400 वर्षांहून जुन्या आग्वाद पोर्ट आणि जेल कॉम्प्लेक्सला भेट दिली. गोव्याच्या वसाहतीकालीन इतिहासाचे आणि स्वातंत्र्यलढ्याचे प्रतीक म्हणून या वारसा स्थळाची पुनर्बांधणी करण्यात आली आहे.

राज्यपालांना या वारसा स्थळाची फेरी इतिहासकार संजीव सरदेसाई यांनी घडवली. त्यांनी 17व्या शतकातील या कॉम्प्लेक्सचे ऐतिहासिक महत्त्व आणि त्याचा वारसा याबद्दल सविस्तर माहिती दिली.

पुशापती अशोक गजपती राजू यांना आग्वाद पोर्ट आणि जेल कॉम्प्लेक्समध्ये आमंत्रित करताना आम्हाला खूप आनंद झाला. राज्यपालांनी येथे सादर करण्यात आलेल्या विविध गोष्टी, विशेषतः आग्वाद इंटरॅक्टिव्ह म्युझियम, पाहून समाधान व्यक्त केले, असे आग्वाद पोर्ट आणि जेल कॉम्प्लेक्सच्या ऑपरेशन्स आणि बिझनेस डेव्हलपमेंटचे उपाध्यक्ष साव्हियो मथायस यांनी सांगितले.

राज्यपालांनी प्रथमच या वारसा स्थळाला भेट दिली. दरम्यान सरदेसाईंनी येथे असलेल्या इतिहासाचे आणि सांस्कृतिक वारशाचे महत्व स्पष्ट केले. आग्वाद इंटरॅक्टिव्ह म्युझियममध्ये राज्यपालांनी पीपल अँड कल्चर विभागही पाहिला. येथे गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्याची माहिती, वसाहती काळातील दैनंदिन जीवनाचे दर्शन आणि गोव्याच्या वारशाची सखोल माहीती जपून ठेवली आहे.

Trending

Exit mobile version