गोवा खबर

स्वच्छता ठेवा, मिळवा १० लाखांचा पुरस्कार

Published

on

Spread the love
  • पालिकांना प्रोत्साहन : जीसुडातर्फे विशेष योजना

गोवा खबर : राज्यातील सर्व पालिकांना स्वच्छतेच्या दिशेने प्रोत्साहन देण्यासाठी शहरी विकास मंत्री विश्वजीत राणे यांनी विशेष योजना जाहीर केली आहे.

या योजनेनुसार, राज्यातील सर्वात स्वच्छ पालिकेला १० लाख रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या पालिकेला ५ लाख रुपये आणि तिसऱ्या क्रमांकाच्या पालिकेला ३ लाख रुपये पुरस्कार दिला जाणार आहे.

याशिवाय पहिला क्रमांक पटकावणाऱ्या पालिकेला जीसुडाच्या अंतर्गत १ ते २ कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर करण्यात येणार आहे.

पणजी येथे झालेल्या कार्यक्रमात राणे म्हणाले की, स्वच्छता ही केवळ एक सवय नसून ती प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. “पंतप्रधान मोदींनी स्वतः ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू केले, आणि आपण पावलोपावली त्यांचा मार्ग अनुसरत आहोत,” असे ते म्हणाले.

पालिकांनी या उपक्रमाला प्रोत्साहन द्यावे तसेच नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक आणि नागरिकांनी एकत्र येऊन स्वच्छता राखावी, असे आवाहनही त्यांनी केले.

तसेच, राज्यातील सफाई कामगारांची दरवर्षी मोफत आरोग्य तपासणी केली जाणार असून त्यांना हेल्थ कार्ड्स जारी केले जातील. यामुळे स्वच्छता उपक्रमाला बळकटी मिळेल, असेही राणे यांनी स्पष्ट केले.

Trending

Exit mobile version