गोवा खबर

काणकोणकरवरील हल्ल्याचा युरी आलेमावाकडून निषेध

Published

on

Spread the love

गोवा खबर : समाजिक कार्यकर्ता रामा काणकोणकरवरील हल्ल्याचा निषेध करताना, विरोधी पक्ष नेता युरी आलेमाव यांनी गुरुवारी सांगितले की पोलिसांच्या संरक्षणात राज्यात ‘गुंडगिरी’ होत आहे आणि यासाठी गोवा लोकांसाठी सुरक्षित आहे का असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला.  

रामा काणकोणकर यांच्यावर हल्ला झाल्यानंतर, युरी आलेमाव यांनी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये त्यांची भेट घेतली.

“समाजिक कार्यकर्ता रामा काणकोणकरवरील हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. या हल्ल्यामागे असलेल्या आरोपींना पकडले पाहिजेत आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला पाहिजेत. गोव्यात पोलीस संरक्षणात हल्ला करणाऱ्यांच्या ‘गुंडागिरी’चा चिंताजनक कल दिसत आहे. चुकीच्या गोष्टींवर बोलणाऱ्या व्यक्तींवर आज हल्ला केला जात आहे, हे चुकीचे आहे’’ असे त्यांनी पुढे म्हटले.

“गृहखाते आणि गुप्तचर यंत्रणां अपयशी ठरली आहेत. यापुर्वी न्यायालयाबाहेर रामा काणकोणकरवर हल्ला झाला होता. पण पोलिसांनी कारवाई केली नाही. अशा गुन्हेगारांना पोलिस संरक्षण मिळत असल्याने गुन्हे वाढत आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्था कोसळली आहे,’’ अशे चिंता त्यांनी व्यक्त केली.

“मी अनेक वेळा सांगितले आहे की काही गुन्हे पोलिसांच्या मदतीने होतात त्यामुळे गुन्हेगारांना कायद्याचा काहीही धाक नाही. यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट करावे की राज्यातील लोक सुरक्षित आहेत की नाही. अशा गुन्हेगारी घटना लोकांमध्ये भय निर्माण करतात,” असे आलेमाव यांनी सांगितले.

“साक्षीदारांच्या म्हणण्याप्रमाणे हल्लेखोरांकडे शस्त्रे होती, ज्यामुळे त्यांना रामा काणकोणकरांना वाचवण्यासाठी हस्तक्षेप करण्यापासून शक्य झाले नाही. गोव्यात गुंडाराज चालले आहे. हे थांबवायला हवे,” असे आलेमाव यांनी म्हटले.

Trending

Exit mobile version