गोवा खबर : माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी संकेत दिले आहेत की, पक्षाकडून प्रस्ताव आल्यास ते भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करण्यास तयार आहेत.
एका मुलाखतीत बोलताना त्यांनी सांगितले, आपला मूळ पिंड भाजपचाच आहे. मागील निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने अपक्ष म्हणून लढावं लागलं, मात्र आता भाजपात परतणे अवघड नाही.
पार्सेकर यांनी स्पष्ट केले की, काही लोकप्रतिनिधींच्या दलालीमुळे जमिनींचे दर प्रचंड वाढले असून यासाठी जबाबदार असणाऱ्या लोकांविषयी मतदारांनी सजग राहणे आवश्यक आहे. त्यांनी भविष्यात उमेदवार निवडताना अधिक सावधगिरी बाळगावी असे मत व्यक्त केले.