गोवा खबर

गोवा केअर्स धोरणातून आरोग्य सेवा दारोदारी

Published

on

Spread the love

गोवा खबर : दोनापावला येथे झालेल्या हेल्थ टेक समिट 2025 मध्ये आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी राज्यातील आरोग्य सेवेसंबंधी मोठी घोषणा केली. त्यांनी स्पष्ट केले की, गोवा केअर्स धोरणाच्या माध्यमातून प्रत्येक गोमंतकीयाच्या दारापर्यंत दर्जेदार वैद्यकीय सेवा पोहचवली जाईल.

राणे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारधारेनुसार गोव्याच्या आरोग्य क्षेत्रात आम्ही सातत्याने सुधारणा करत आहोत. याअंतर्गत गोव्यात आधुनिक कॅन्सर इस्पितळ, माता-मुल सेवा विभाग अशा अनेक सुविधा उभ्या राहत आहेत.

ते पुढे म्हणाले की, स्टेट केअर धोरण आरोग्य खाते लवकरच जाहीर करणार आहे. या धोरणातून महिला, पुरुष, मुले आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्व घटकांच्या आरोग्याची काळजी वेगाने आणि कार्यक्षम पद्धतीने घेतली जाईल.

आरोग्यमंत्री म्हणाले, प्रत्येक नागरिकाला दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळण्याचा अधिकार आहे आणि तेच आमचे ध्येय आहे.

Trending

Exit mobile version